Wednesday, February 4, 2026
HomeनगरShrirampur : माजी आ. मुरकुटे, छल्लारे शिंदे सेनेच्या वाटेवर

Shrirampur : माजी आ. मुरकुटे, छल्लारे शिंदे सेनेच्या वाटेवर

येत्या शनिवारी ठाण्यात होणार प्रवेश सोहळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे तसेच शिवसेना (उबाठा) शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर आहेत. येत्या शनिवार दि. 7 जून रोजी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

- Advertisement -

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ‘मुक्तागिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आ. भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास उध्दव ठाकरे शिवसेनेचे श्रीरामपूर शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर उपस्थित होते.
येत्या शनिवार दि. 7 जून रोजी दुपारी 1 वाजता ठाणे येथे शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

YouTube video player

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर अनेकांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माजी आ. भानुदास मुरकुटे राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेश करतील अशी चर्चा सुरु असतानाच त्यांच्या आधी त्यांचे स्थानिक विरोधक अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी राष्ट्रवादीच्या चालत्या गाडीची शिट पकडली. त्यामुळे मुरकुटे शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता होती मात्र त्याला मुहूर्त सापडला नाही. आता तो योग जुळून आला असून माजी आ. मुरकुटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांना काही महिन्यात श्रीरामपूर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र छल्लारे तेथे फार काळ रमले नाही. तेही आपल्या कार्यकर्त्यांसह येत्या शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...