श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात न बसवता अचानक व बेकायदेशीरपणे
संगमनेर रोडवरील गोविंदराव आदिक सभागृहाच्या मोकळ्या जागेत बसविण्याची नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांची योजना आहे. या योजनेच्या विरोधात श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने काल अचानक मुख्यायाधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला व प्रचंड घोषणाबाजी केली शिवाजी चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या विषयात तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलवा, अशी मागणी केली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने मुख्याधिकार्यांना घेराव घालून त्यांच्या कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करून नगरपालिकेची इमारत दणाणून सोडली या घेरावेचे नेतृत्व संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते, बाबा शिंदे, नगरसेवक किरण लुणिया, संजय पांडे, सरपंच महेंद्र साळवी, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे ,प्रवीण पैठणकर अभिजीत कुलकर्णी, सोमनाथ कदम ,संजय यादव, बबन जाधव, सँन्डी पवार, उमेश धनवटे, सुहास पवार, आदींनी केले आहे.
या घेरावप्रसंगी मुख्याधिकार्यांशी बोलताना संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते म्हणाले शिवाजी चौकाची जागा बदलून अचानक गोविंदराव आदिक सभागृहाच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे छत्रपतींचा पुतळा बसवण्याची नगराध्यक्षांनी भूमिका घेतलेली आहे तुम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी या नात्याने असा बेकायदेशीर प्रकार होऊ देऊ नका याचे परिणाम वाईट होतील.
हिंदू समाज अशी बनवाबनवी सहन करणार नाही, असा इशारा श्री चित्ते यांनी यावेळी दिला, यावेळी मुख्यअधिकार्यांशी बोलताना नगरसेवक किरण लूनिया यांनी छत्रपतींचा शिवाजी चौकातील अश्वारूढ पुतळा या विषयावर प्रत्यक्ष सभागृहातील विशेष सर्वसाधारण सभा ताबडतोब बोलवावी अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.
यावर बोलताना मुख्याधिकारी गणेश शिंदे म्हणाले नगरपालिकेचा प्रशासन प्रमुख म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा संदर्भात कुठलीही बेकायदेशीर कृती होऊ देणार नाही व एक चतुर्थांश नगरसेवकांनी मागणी केल्यास या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलता येऊ शकते असे सांगून श्री शिंदे म्हणाले की विशेष सर्वसाधारण सभेची आपण केलेली मागणी मी नगराध्यक्षांना सांगतो यावर अनेक मुद्द्यांवर बरीच चर्चा होऊन संघर्ष समितीने केलेले आंदोलन थांबवले.
या आंदोलनात अर्जुन करपे, संदीप वाघमारे, विशाल त्रिवेदी, गणेश खरात, सतीश ससाने, विकी देशमुख, निलेश फासाटे, रवींद्र चव्हाण, विकी चव्हाण, दुर्गेश गायकवाड, सुनील खरात, संजय रुपटक्के, मच्छिंद्र बहिरे, आकाश शिंदे, राहुल चव्हाण, किरण भोसले, सचिन शरणागत, संदीप साठे, विषाल सुरडकर, बाबाजी शिंदे, अविनाश ढवळे, हरी ढोकचवळे, महेश विश्वकर्मा, राहुल ढोकचौळे, सुनिल पवार, राजू पडवळ, सुनील शिंदे, निलेश गायकवाड, दुर्गेश गायकवाड, पप्पू थोरात, आदींनी सहभाग घेतला.