श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
ऐन दिवाळीत (Diwali) शहरातील मोरगे वस्ती येथील सिद्धीविनायक मंदिरजवळ काल रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान बंद घर फोडून (Burglary) पितळाच्या भांड्यांसह दहा ते पंधरा हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी (Theft) लंपास केली आहे. मोरगे वस्ती येथील राजेंद्र रामचंद्र सोमवंशी यांचे बंद असलेले घर काल रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान फोडण्यात आले. राजेंद्र सोमवंशी नगर येथील एमआयडीसीत (MIDC) कामाला आहे. त्यामुळे त्यांची आई कमलबाई सोमवंशी या घरात एकट्या राहतात.
दि.25 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या बहिणी जनाबाई जानराव यांच्या घरी रात्री झोपावयास गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दिवाण, कपाट, तसेच किचनमधील स्टीलचे डब्ब्याची उचकापाचक केली. कपाटातील 10 ते 15 हजारांची रोकड तसेच पितळाचे हंडे, पितळाचे मोठे पातले, समई, टीव्हीचा सेटऑफ बॉक्स, तसेच मुलांचा पैशाचा गल्ला असा मुद्ेमाल चोरट्यांनी लंपास गेला.
काल सकाळी शेजारी राहत असलेल्या ललित कोठारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी राजेंद्र सोमवंशी यांना या बाबत कल्पना दिली. त्यानंतर सोमवंशी यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थाळी येवून पहाणी करत आरोपींना लवकरात लवकर जेदबंद करून अशी ग्वाही दिली.