Saturday, February 15, 2025
Homeनगरश्रीरामपूर येथून बालकास पळवून नेणार्‍या महिलेस देवळालीत पकडले

श्रीरामपूर येथून बालकास पळवून नेणार्‍या महिलेस देवळालीत पकडले

बेलापूर |वार्ताहर| Belapur

गायकवाड वस्ती गोल्डन चारीयट जवळून काल रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका महिलेने लहान मुलाला पळवून नेल्याची घटना घडली. घटनेची माहिती कळताच बेलापूर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून संबंधित महिलेला मुलासह ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरु होते.

- Advertisement -

बेलापूर- श्रीरामपूर रोडवर असणार्‍या गायकवाड वस्ती येथून सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातू परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते. सदर महिलेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन यांनी सदर महिलेचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना बेलापूर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे, पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ, संपत बडे, भारत तमनर आदिंनी परिसरात शोध घेतला.

दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवूनन घेऊन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरिकांनी या महिलेला पाहिले. त्यांनी तातडीने बेलापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. बेलापूर पोलीस स्टेशनचे काँन्स्टेबल संपत बडे व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणा़र्‍या महिलेस ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन वर्ष वयाच्या परवेज शेख यास पळवून नेणारी महिला खैरुनिसा अकबर शेख ही नाशिक येथील रहीवासी असून काही वर्षापूर्वी ती गायकवाड वस्ती येथे रहात होती.

नाशिक येथे तिने विवाह केला होता. दहा बारा वर्षानंतर तिने पतीला सोडून दिले. गायकवाड वस्ती येथे तिची पहिल्या नव़र्‍याची मुलगी रहात आहे. ती लहान असतानाच ती त्या लहान मुलीला सोडून गेली होती. आज ती मुलगी सज्ञान झालेली आहे. तिला नेण्यासाठी खैरुनिसा ही गायकवाड वस्ती येथे आली होती. परंतु मुलीने येण्यास नकार दिल्यामुळे तिने हे दोन वर्षाचे मुल घेऊन पळ काढला होता. परंतु पोलिसांनी ती गायब होण्याच्या आतच तिला मुलासह ताब्यात घेतले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या