Sunday, May 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 61 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 61 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल नवीन 61 करोनाबाधितांची भर पडल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा 2007 वर जाऊन पोहोचला आहे. तर मृत्यू झालेल्याची संख्या 38 आहे.

- Advertisement -

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 61 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून यात 20 जण पॉझिटिव्ह तर 41 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

नगर जिल्हा रुग्णालय चाचणीत 02, अँटीजेन चाचणीत 18 तर खासगी प्रयोग शाळेत 21 असे सर्व मिळून कालच्या एका दिवसात 61 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 41 जणांनी करोनावर मात केल्याने काल त्यांना घरी सोडण्यात आले. 39 रुग्ण अ‍ॅडमिट करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 4645 जणांची चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 2007 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काल श्रीरामपूर येथील आंबेडकर वसतिगृहात 27 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले असून ते तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर आठ जणांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

कालच्या रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये वॉर्ड नं. एक़ -1, वॉर्ड नं. दोन-1, वॉर्ड नं. सात-5, बेलापूर-3, खिर्डी-4, गोंडेगाव 1, टाकळीभान 1, पढेगाव-1, खंडाळा-1, वांगी बुद्रुक-2, अशा 20 रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या