Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीरामपुरात 18 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपुरात 18 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 18 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

- Advertisement -

काल सर्वाधिक 115 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून तेथे 11 पॉझिटिव्ह तर 104 निगेटीव्ह आढळून आले आहेत. खासगीत 04 तर जिल्हा रुग्णालयात 3 असे 18 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2743 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

काल एकूण 06 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 16 जण उपचार घेत आहेत. 2 रुग्णांस दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10173 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या