Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात नवीन 45 करोना रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 45 करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 45 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 331 वर जाऊन पोहोचली. हे सर्व रुग्ण ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 11 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी रुग्णालयात 16 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 29 असे रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 16226 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16008 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 12 तर ग्रामीण भागात 31 असे 43 तर अन्य तालुक्यातील 02 असे एकूण 45 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 6-03, वॉर्ड नं. 7-04 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-02, बेलापूर खुर्द-02, गळनिंब-05, कारेगाव-09, उंबरगाव-09, भोकर-01, सराला-01, गोंधवणी-01, शिरसगाव-02, नायगाव-01, गोंडेगाव-02, माळवाडगाव-01, भामाठाण-01, असे ग्रामीण भागात 31 तर अन्य तालुक्यातील 02 असे 45 रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या