Thursday, January 29, 2026
Homeनगरधक्कादायक! दोन गटात झालेल्या वादातून फटाक्याचे दुकान पेटवले

धक्कादायक! दोन गटात झालेल्या वादातून फटाक्याचे दुकान पेटवले

श्रीरामपूर । प्रतिनिधी

दोन गटात झालेल्या वादातून काही तरुणांनी फटाका स्टॉलला आग लावल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. यामध्ये सदर फटाका स्टॉल धारकाचे लाखाचे नुकसान झाल्याचे समजते.

- Advertisement -

दिवाळी सणानिमित्त श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर फटाक्याचे स्टॉल लावण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांमध्ये फटाक्यावरून वाद झाले. या वादानंतर काही तरुणांनी गाळा नंबर २७ मधील चिंतामण फटाका स्टॉलला आग लावली.

YouTube video player

या घटनेत सदर फटाका स्टॉल धारकाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. पंचनामा केला होता मात्र याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वी शरद पवारांनी हात जोडले,...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...