Monday, May 20, 2024
Homeनगरटिळकनगर-एकलहरे रस्त्यावर भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची मागणी

टिळकनगर-एकलहरे रस्त्यावर भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची मागणी

टिळकनगर | वार्ताहर

तालुक्यातील टिळकनगर-एकलहरे रस्त्यावर भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.काल रात्रीच्या दरम्यान या रस्त्यालगद दोन ठिकाणी भुरट्या चोरट्यांनी डल्ला मारला असून, एकलहरे येथील प्रगतशील शेतकरी राजू वहाब यांच्या किराणा दुकानात असलेली टू. एचपी पिठाची गिरणी (अंदाजे किंमत 1200 हजार) चोरीला गेली तर दुसऱ्या घटनेत आदेश दत्तात्रय गिरमे यांच्या गिरमे वस्तीवरील राहत्या घरासमोरून चार्जिंग पंप (किंमत 2000 हजार) चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

- Advertisement -

Harish Salve : भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर, ६८ व्या वर्षी लग्न, वधू कोण?

राजू वहाब व सरपंच पती अनिस शेख यांनी याबाबद बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून येथील पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परिसरात मागील काही महिन्यांपासून चोरीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती मुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली असतांना आता शेतकऱ्यांना भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकही वैतागले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सेवा सोसायटीचे चेअरमन अन्सार आजम शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, अनिस शेख, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच रमेश कोल्हे, ग्रामपंचायत सदस्या नसिमखातुन जहागीरदार, अनुसया इंगळे, बबन झिने, राजू जहागिदार, बाळकृष्ण गिरमे, मलिक जहागीरदार, खलीक जहागीरदार, सादिक जहागीरदार आकाश गिरमे, रय्यान शेख, मजिद पठाण, पांडू पवार सह ग्रामस्थांनी केली आहे.

Chandrayaan 3 च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन

- Advertisment -

ताज्या बातम्या