Monday, May 27, 2024
Homeनगरश्रीरामपूर जिल्ह्यासाठी लाक्षणिक उपोषण; 2 जानेवारीला विराट मोर्चा

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी लाक्षणिक उपोषण; 2 जानेवारीला विराट मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी काल सकाळी शहरातील गांधी पुतळ्यासमोर श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठाणच्यावतीने बिगर राजकीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणामध्ये श्रीरामपूरकरांसह व्यापारी, सर्वपक्षीय राजकारणी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख व शिवप्रहारचे मावळे सहभागी झाले होते.

- Advertisement -

यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक भागात, गल्लीत, परिसरात जिल्ह्यासाठी जनजागृतीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असून या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. हे लाक्षणिक उपोषण भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांच्या विनंतीवरुन सोडण्यात आले.

याप्रसंगी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे प्रमुख प्रतापराव भोसले म्हणाले, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व प्रमुख नेते मंडळींची भेट घेऊन त्यांना या लढ्यात सहभागी करुन घेणार आहे. जिल्हा विभाजन झाले तर श्रीरामपूरच मुख्यालय होईल, अन्यथा जिल्ह्याचे विभाजन होणार नाही. दि. 2 जानेवारी 2024 रोजी श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष सुरज आगे म्हणाले, प्रमुख कार्यालये श्रीरामपूरमध्ये असून श्रीरामपूरच जिल्हा मुख्यालय व्हावे. देशात प्रभू श्रीरामांच्या नावाचे भव्य राममंदिर बनवू शकते तर प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा का नाही? या जिल्हा मोहिमेमध्ये सर्वांनी बिगर राजकीय पद्धतीने सहभागी व्हावे.

यावेळी माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी मी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या लोक चळवळीत सुरुवातीपासून असून श्रीरामपूर जिल्हा होईपर्यंत मी आपल्याबरोबर राहील, अशी ग्वाही दिली.

माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर, सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर यांच्यासह अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा मोहिमेसाठी सर्वपक्षीय पाठिंबा देवून सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी चंद्रशेखर आगे, बाळासाहेब खाबिया, प्रविण गुलाटी, देविदास देसाई, वरुण अग्रवाल, विजय नगरकर, संजय कासलीवाल, निलेश बोरावके, गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला, नागेश सावंत, अशोक बागुल, छावाचे सुभाष जंगले, मुजफ्फर शेख, मुक्तार शहा, अण्णासाहेब डावखर, संजय गांगड, तिलक डुंगरवाल, सरवरअली सय्यद, रज्जाक पठाण, जोएब जमादार, बाळासाहेब भोसले, रुपेश हरकल, आनंद खर्डे, नितीन पटारे, सदा कराड यांच्यासह श्रीरामपूरकरांसह शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या