Saturday, May 18, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा

श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अपुरा पाऊस आणि खंडीत वीजपुरवठा यामुळे खरिपातील पिके जळून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याच्यावतीने श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

याबाबत तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले असून गावतळे भरून काढावे, नियमित विज पुरवठा करावा, अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम त्वरीत मिळावी व खरिपातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

माजी आ. भाऊसाहेब कांबळे म्हणाले, तालुक्यात तीन महिने झाले तरी पाऊस नाही. पाणी पातळी खालावली आहे. पाऊस नसल्यामुळे उभी पिके जळाल्याने शेतकर्‍यांचा पेरणीचा खर्च वाया गेला आहे. त्यात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने आणखीनच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

संजय छल्लारे म्हणाले, अधिकार्‍यांनी कार्यालयातून पंचनामे न करता थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पंचनामे करावेत. तसेच शेतकर्‍यांना संकटात लोटणार्‍या शिंदे सरकारच्या अतिवृष्टीची मदत अद्यापही न मिळाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शिंदे सरकारने त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करुन न्याय द्यावा. अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही तर वंचित शेतकर्‍यांसह ठाकरे-शिवसेना तहसील कार्यालयासमोर शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार श्री. छल्लारे यांनी केला.

याप्रसंगी अशोक थोरे, सदा कराड, सचिन बडदे, श्री. बोरकर, प्रदीप वाघ, अतुल शेटे, शेखर दुबैय्या यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, राजेंद्र बोरसे, संजय साळवे, अरुण पाटील, शिवा पानसरे, अशोक पवार, शुभम ताके, विजय बडाख, प्रतिक यादव, निखिल पवार, लखन भगत, महंता यादव, लक्ष्मण कुमावत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या