Wednesday, January 7, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात कालवा हद्दीतील पोलिस मदत केंद्रासह अतिक्रमणधारकांना नोटीसा

Shrirampur : श्रीरामपुरात कालवा हद्दीतील पोलिस मदत केंद्रासह अतिक्रमणधारकांना नोटीसा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात जलसंपदा विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून याबाबत शहरातील पाटाच्याकडेला असलेल्या दोनशे अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. सात दिवसांच्या आत सदर अतिक्रमण काढून जागा रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता संजय कल्हापूरे यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भगतसिंग चौकात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली होती. या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन मार्च 2025 मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या हस्ते मोठ्या डामडौलात करण्यात आले होते. तेव्हापासून हे पोलीस केंद्र कार्यान्वित झाले होते. मात्र, ज्या जागेवर हे मदत केंद्र उभारण्यात आले आहे, ती जागा जलसंपदा विभागाच्या मालकीची असल्याचे या पोलीस मदत केंद्रास नोटीस बजवण्यात आली आहे.

YouTube video player

यापूर्वीही दोनवेळा संबंधित अतिक्रमणधारकांना जलसंपदा विभागाने नोटीसा दिल्या होत्या. मात्र, तेव्हा कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती, मात्र आता पुन्हा तिसर्‍यांदा नोटीस बजावल्या असून शहरातील सरस्वती कॉलनीपासून सदर नोटीस बजावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.सात दिवसांच्या आत सदर नागरिकांनी अतिक्रमण न काढल्यास कायदेशीर कारवाई करत सदरचे अतिक्रमण जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात येणार आहे.

यापूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमणे काढून शहराचा कायपालट केला असला तरी अनेक व्यावसायिक विस्थापित झाले आहेत. त्यात आता पुन्हा जलसंपदा विभागाने अतिथी कॉलनी पासून कालव्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटीसा पाठवून अतिक्रमणे सात दिवसाच्या आत काढून घेऊन सदरची जागा रिक्त करावी अन्यथा महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 व बीएनएस 2023 अन्वये कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला असून सदर अतिक्रमण न काढल्यास जलसंपदा विभाग हे अतिक्रमण काढणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शहरातील भगतसिंग चौकातील पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या अतिक्रमणात आल्याने पोलीस मदत केंद्रास सात दिवसात अतिक्रमण काढण्या बाबत नोटीस काढण्यात आली. मात्र सदर नोटीस स्विकारण्यासाठी पोलीस मदत केंद्रात कर्मचारी उपस्थित नसल्याने जलसंपदा विभागाने सदरची नोटीस पोलीस मदत केंद्राच्या दरवाजाजवळ चिटकवली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...