Friday, April 25, 2025
HomeनगरBhanudas Murkute : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना जामीन मंजूर

Bhanudas Murkute : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना जामीन मंजूर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेले श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पुर्वसंध्येला ते बाहेर येणार आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापुर्वी श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिसांनी त्यांना लगेचच अटक केली. जिल्हा न्यायालयात मुरकुटे यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

जिल्हा न्यायालयाने मुरकुटे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असल्याची माहिती मुरकुटे यांचे वकील अॅड. राहुल कर्पे यांनी दिली. दरम्यान मतदानाच्या अगोदर जामीन मंजूर झाल्याने मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...