Saturday, October 3, 2026
Homeक्राईमश्रीरामपुरात बनावट दारु अड्ड्यांवर छापा

श्रीरामपुरात बनावट दारु अड्ड्यांवर छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात बनावट दारू निर्मितीचा गोरखधंदा करणार्‍यांवर अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. शहरातील बाजारतळ वॉर्ड क्र.3 मधील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश करत, दोन्ही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत 79 हजार 970 रुपयाचा बनावट दारूचा साठा आणि निर्मिती साहित्य जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. 2 यांनी ही संयुक्त कारवाई पार पाडली. शहरातील बाजारतळ वॉर्ड क्र. 3 येथील एका घरात बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त बातमी मिळताच, पथकाने सदर ठिकाणी जावून कारवाई केली. या ठिकाणाहुन 79 हजार 970 रुपयाच्या मुद्देमालासह मनोज भाऊसाहेब पवार, शुभम भाऊसाहेब पवार आणि हिराबाई भाऊसाहेब पवार या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी बनावट दारूसाठी लागणारे मद्यार्क राहुल बाळू फुलारे (रा. लोंढे मळा, खबडी जवळ, श्रीरामपूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल फुलारेच्या घरावरही छापा टाकला असता, तिथे तब्बल 160 लिटर शुद्ध मद्यार्काचा साठा मिळून आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच, राहुल बाळू फुलारे पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला.

यावेळी त्याच्या घरी उपस्थित असलेला बाळू फुलारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व आरोपींकडून एकूण 79 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील बनावट दारूच्या धंद्याला मोठा हादरा बसला आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...