Monday, June 17, 2024
Homeनगरश्रीरामपुरात बनावट गुटखा कारखान्यावर ‘एलसीबी’चा छापा

श्रीरामपुरात बनावट गुटखा कारखान्यावर ‘एलसीबी’चा छापा

22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त || श्रीरामपूर, बेलापुरच्या दोघांच्या मुसक्या आवळल्या || रांजणखोल, राहुरी फॅक्टरीच्य दोनजणांसह चौघे पसार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात बनावट गुटखा तयार करणार्‍या कारखान्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे (एलसीबी) शाखेच्या पथकाने छापा टाकून 22 लाख 15 हजार 756 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघे पसार झाले आहेत.

विमल पानमसाला नावाने बनावट गुटखा या ठिकाणी तयार केला जात होता. सुनिल महादेव जगदाळे, ह.रा. इंडियाबुल्स अपार्टमेंट, फ्लॅट नं 2801, कोनगाव, कार्तिक किशोर जेकवाडे, रा. बेलापूर रोड, श्रीरामपूर, सचिन भैरवनाथ नवले, रा.सुभाषवाडी, बेलापूर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गोपी ओझा, ह.रा.वारजे, माळवाडी पुणे, जीवन पवार, रा. लोढा पलावा, डोंबिवली, जि.ठाणे, प्रफुल्ल बाबासाहेब ढोकचौळे, रा.रांजणखोल, सुभाष घोरपडे, रा. राहुरी फॅक्टरी, ता.राहुरी हे पसार आहेत.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश भिंगारदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहिती मिळाली की, श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये स्पर्श एंटरप्रायझेस सी 67 कंपनीसमोर एका कंपनीमध्ये ओझा, पवार हे ढोकचौळे व घोरपडे यांच्या कंपनीमध्ये साथीदारांसह सुपारी, पांढरे रंगाची पावडर, तंबाखू मशिनद्वारे एकत्र करुन बनावट विमल पानमसाला व व्ही 1 तंबाखू तयार करुन त्याचे पॅकींग लेबलींग करुन त्यांची काळे रंगाची कार (क्र.एमएच 02 सीव्ही 0653) मध्ये भरुन विक्री करणार आहेत. ही माहिती मिळताच श्री आहेर यांनी याठिकाणी कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे, मुख्य हवालदार दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, संतोष लोढे, पोलिस नाईक संदीप चव्हाण, संभाजी कोतकर यांचे पथक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह कारवाईसाठी सदर ठिकाणी सायंकाळी पाच वाजता धडकले.

या पथकाने याठिकाणी छापा टाकला असता तेथे तीन व्यक्ती राज्यामध्ये बंदी असलेला व शरिरास घातक असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखूचे उत्पादन व विमल ब्रॅण्ड नावाने बनावट पॅकींग करतांना दिसून आले. कंपनीची पाहणी केली असता तेथे ग्रायंडिंग मशीन, ओव्हन, पॅकेजिंग मशीन व एक मोठे ग्रायंडिंग मिक्सींग मशीन तसेच सुपारी, विमल व्ही 1 कंपनीचे प्लॅस्टीकचे रोल, पांढरे रंगाचे पावडरच्या गोण्या तसेच तयार केलेल्या विमल पानमसाला व व्ही 1 तंबाखू असे साहित्य पडलेले दिसून आले. कंपनीसमोर उभी असलेली कार (क्र. एमएच 02 सीव्ही 0653) ची पाहणी केली असता तिच्या पाठीमागील डिकीमध्ये विमल पानमासाला व व्ही 1 तंबाखूच्या बॅगा भरलेले दिसून आले.

या कारवाईत ग्रायंडींग मशीन, इलेक्ट्रीक ओव्हन, एक पॅकेजींग मशीन, एक इलेक्ट्रीक मिक्सर, पोर्टेबल बॅग क्लोझर मशीन, विमल पानमसालाचे एकूण 27 बॅग, व्ही 1 तंबाखूचे 16 बॅग, चुरा केलेली सुपारी, पांढरे रंगाचे पावडरचे चार गोण्या, विमल पानमसाला नावाचा प्लॅस्टीकचा रोल व पाऊच, सुगंधी द्रव्य त्यावर नाव नसलेला प्लॅस्टिक ड्रम, एक काळ्या रंगाची कार, कारच्या डिकीमध्ये विमल पानमसालाचे बॅग, व्ही 1 तंबाखूचे 10 बॅग असा एकूण 22 लाख 15 हजार 756 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या