नाऊर |वार्ताहर| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एकच घरातील तीन मुलींसह एक लहान मुलगा अचानक गायब झाले असून सदर मुली गवत आणण्यासाठी चालली असल्याचे सांगून गेले. मात्र सायंकाळ होईपर्यंत घरी ते परतले नाही. येथे राहत असलेले एकाच घरातील मुलगी तिचा दोन ते अडीच वर्षाचा एक मुलगा, तिची सख्खी बहीण व तिची मामे बहीण असे चौघे हे सर्व दुपारी 4 वाजेच्या सुमारास विळा खुरपे घेऊन गायांसाठी गवत आणते, असे घरी सांगून निघून गेल्या, गणपती विसर्जन सुरू असताना गोदावरी नदीकडील पुलाजवळून शेताकडे जात असताना त्यांना काहींनी पाहिले असल्याची चर्चा असून त्या रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुंटुबासह ग्रामस्थांनी त्यांची शोध मोहिम हाती घेतली.
या दरम्यान ग्रामस्थानी नदीलगतची मका, ऊस शेती सह विद्युत मोटारीच्या केबलकडे पाहणी केली तसेच त्या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने अखेर त्या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आपल्या दोन मुली, नातू तसेच आपल्या सख्या भावाची मुलगी हे बेपत्ता झाले असल्याची खबर दिल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदीप भवर तसेच प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी या गंभीर घटने प्रकरणी स्वतः लक्ष घातले असून तांत्रिक बाबीचा सखोल तपास सुरू केला असून लवकरच बेपत्ता झालेल्या मुली व बालक सापडतील अशा तपास सुरु केला आहे.




