Thursday, October 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर शहरात लावलेला ‘तो’ फ्लेक्स बोर्ड बनला चर्चेचा विषय

श्रीरामपूर शहरात लावलेला ‘तो’ फ्लेक्स बोर्ड बनला चर्चेचा विषय

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील एका वैतागलेल्या मतदाराने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातील रस्त्यांची जाणीव करून देणारा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्स बोर्डवरील ‘पाच वर्षांच्या आमदारकीने, मालामाल झाले ठेकेदार, सामान्य श्रीरामपूरवासीय मात्र, खड्ड्यांनी बेजार हा मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

नगरपालिका दरवर्षी रस्ते, गटार आदींसह विविध विकासकामे करत असते. आमदार, खासदार फंडातूनही शहरात तसेच तालुक्यात कामे केली जातात. त्याबरोबर राज्य व केंद्र शासनाकडूनही दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. तरीही शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अवस्था विदारक आहे. शेकडो कोटींचा निधी मुरतो कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. निधीतील बहुतांश रक्कम टक्केवारीतच जात असल्याने कामांचा दर्जा निकृष्ट होत आहे.

परिणामी रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शहरातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. एकूणच यामुळे शहरासह तालुक्यातील नागरीकांना रस्त्यांच्या खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याने तालुक्यात अपघाताची मालिकाच सुरू आहे. यामुळेच वैतागलेल्या एका मतदाराने शहरात लावलेला हा फ्लेक्स बोर्ड चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या