श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील थत्ते मैदान येथे सुरू असलेल्या पाळण्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास एकाला गावठी कट्ट्यासह (Gavathi Katta) पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 4 जिवंत काडतुसे जप्त (Cartridges Seized) करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीसात (Shrirampur City Police) पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मनोज संजय साबळे, (वय 23) राहणार श्रीरामपूर याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरिक्षक समाधान सोळके, दादाभाई मगरे, पोलीस कर्मचारी अमोल पाडोळे, पंकज सानप, सागर बनसोडे, संजय बडे हे मंगळवारी रात्री थत्ते मैदान येथे सुरु असलेल्या यात्रेत पेट्रोलिंग करत असतांना मौत का कुवा जवळ जॉगिंग ट्रॅकवर एक तरूण गावठी कट्टयासह असल्याची माहीती मिळाली. यावेळी त्याला पकडले असता त्याच्या जवळ 4 जीवंत काडतुसे (Cartridges) व गावठी कट्टा (Gavathi Katta) पिस्तुल आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.