Monday, April 28, 2025
Homeनगरश्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गावठी कट्टा व जिवंत राऊंड असा 2 लाख 17 हजार रुपयांच्या मुद्देमालासह एकास श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार शंकर साळवे (वय 23, रा. राजेंद्र कॉम्पलेक्स, काळाराम मंदीर रोड, वार्ड नं.07, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना शहरातील सिध्दीविनायक मंदिर ते काळाराम मंदीर वॉर्ड नं. 7 भागात एक इसम गावठी कट्टा जवळ बाळगून बुलेट मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. गवळी यांनी अशोकनगर बिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असलेल्या तपास पथकास सदर ठिकाणी जावून खात्री करुन कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथक त्याठिकाणी गेले असता एक संशयित बुलेट मोटारसायकलजवळ पाटाच्या कडेला उभा दिसला. त्याने पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने त्याला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचे नाव ओंकार शंकर साळवे (रा. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर गावठी कट्टा व दोन राऊंड मिळून आल्याने त्याला अटक केली.

आरोपीविरुध्द गुरंन. 907/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून एक राखाडी रंगाचा गावठी कट्टा, दोन पिवळ्या रंगाचे राऊंड, व्हिओ कंपनीचा मोबाईल, बुलेट मोटारसायकल असा सुमारे 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सपोनि जीवन बोरसे, पोहेकॉ संतोष परदेशी, पोना रघुवीर कारखेले, पोकॉ राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात यांनी केली. घटनेचा तपास पोसई जीवन बोरसे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

तीव्र

मुलगी IAS झाल्याच्या आनंदोत्सवात वडिलांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
यवतमाळ | Yavatmal यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे आनंदाचा क्षण दुसऱ्या मिनिटाला दु:खात बदलला.मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र...