Friday, April 11, 2025
Homeनगरश्रीरामपुरात उष्माघाताचा बळी ?

श्रीरामपुरात उष्माघाताचा बळी ?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात काल 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो आहे. लोकच नाही तर पशु-पक्षीही गर्मीने हैराण झाले आहेत. अशातच एका 65 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील वॉर्ड नं. 7 येथील राजकुमार धरमचंद चुडीवाल (वय 65) यांचे हृदयविकाराने निधन झाले.
भगवान महावीर जयंती जन्मकल्याणक शोभा यात्रेत राजकुमार चुडीवाल सकाळी सहभागी झाले होते. शोभा यात्रेत उन्हाचा चटका लागल्यामुळे ते पाणी प्याले असता त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला.

- Advertisement -

तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गौतम साबद्रा यांनी नेत्रतज्ञांचे वतीने केले. त्यांच्या पश्चात पती, दोन बधू, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे. ते महावीर सप्लायर्सचे अनिल चुडीवाल, पुष्पाबाई रसिकलाल बडजाते तसेच किशोर, संजय, अजय चुडीवाल यांचे बंधू तर जयेश, श्रेयश चुडीवाल यांचे ते वडील होत.

उष्माघात कसा टाळावा ?
उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
– तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणार्‍या क्रिया वा हालचाली करू नका.
– वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा.
– घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला.
– डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट – चपला वापरा.
– अल्कोहोल, चहा – कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही पेयं टाळा.
– प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका
– जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी – छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं – पाळीव प्राण्यांना सोडू नका.
– तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– लस्सी, तोरणी (तांदळाचं पाणी), लिंबू सरबत, ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील.
– पंखे, ओला नॅपकीन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी फॅक्टरी येथे महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये शिरला

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात काल दि. 10 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेली अनेक वाहने उडवून...