Thursday, September 10, 2026
Homeनगर'त्या' इन्व्हेस्टर कंपनीच्या कार्यालयाची पोलिसांकडून झडती

‘त्या’ इन्व्हेस्टर कंपनीच्या कार्यालयाची पोलिसांकडून झडती

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

जादा परताव्याचे अमिष दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील त्या ‘इन्व्हेस्टर’ कंपनीच्या कार्यालयाची काल अपर पोलीस अधिक्षक व पोलीस उपाधिक्षक कार्यालयाच्या पथकाने झडती सुरु केली असून या कारवाईचे संपूर्ण व्हिडीओ शुटींग करुन रितसर पंचनामा करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात एका अलिशान बंगल्यात या ‘इन्व्हेस्टर’ कंपनीने आपले कार्यालय थाटले आहे. त्यासाठी एका पंथाचा आधार घेण्यात आला असून आपल्या पंथाचे प्रमुख जबाबदार व्यक्तीवर विश्वास ठेवून अनेकजण या कंपनीत गुंतवणूक करीत आहेत. या कंपनीच्या कारभाराची माहिती एका गुंतवणूकदाराने निनावी पत्राद्वारे केली आहे. याबाबत दैनिक सार्वमतने आवाज उठविला होता. ही तक्रार अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडेही करण्यात आली होती. सार्वमतच्या वृत्ताची तसेच त्यांच्याकडे आलेल्या तोंडी तक्रारीची अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दखल घेत काल दुपारी या कंपनीचे कार्यालय असलेल्या अलिशान बंगल्याची झडती सुरु केली.

याबाबत माहिती देताना श्री. वाघचौरे यांनी सांगितले की, संपूर्ण झडतीचे व्हिडिओ शूटिंग करून रितसर पंचनामा करण्यात आला आहे. काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. कार्यालयाला पोलीस विभागाकडून पंचासमक्ष सील लावण्यात आले आहे. संबंधितांना रितसर समन्स बजावून, परवानगी बाबतचे दस्तऐवजांची पडताळणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस विभाग करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सदर इन्वेस्टमेंट कंपनी बाबत तोंडी स्वरूपात पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त होत होत्या.

पुढील संभाव्य फसवणुकीच्या प्रकारांना आळा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः होऊन सदरची कारवाई सुरु केली असून रात्री उशिरापर्यंत हे झडतीसत्र सुरु असल्याची माहिती श्री. वाघचौरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...