Saturday, September 12, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात आढळली लंपी रोगाची जनावरे

Shrirampur : श्रीरामपुरात आढळली लंपी रोगाची जनावरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मिनी स्टेडियम मध्ये तलाठी कार्यालय व नगरपालिकेच्या जन आरोग्य केंद्राजवळ असणार्‍या मोकाट जनावरांना लंपी या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. लंपी रोग हा संसर्गजन्य असल्याने तो इतर जनावरांना सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी कार्यालय व जन आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांचा सातत्याने वावर असल्याने या रोगाची लक्षणे नागरिकांना सुद्धा होऊ शकतात का याबद्दल तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

मिनी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. त्यांचे मालकही आहेत त्यांनी ती मोकाट सोडून दिलेली आहे. दिवसभर तिकडे फिरवून ही जनावरे संध्याकाळी तेथे येवून बसत असल्याने या परिसरात सर्वत्र शेण आणि मूत्राचा वास येत असतो. यापैकी अनेक जनावरांना लंबी सदृश्य रोगाची लागण झाल्याची दिसून आले आहे. नगरपालिकेकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे काम असल्याचे सांगितले.

त्यामुळे पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय संवर्धन अधिकार्‍यांनी तातडीने याबाबत पाऊल उचलून सदर जनावरांना योग्य ते औषध उपचार करावेत, आणि त्यांना येथून बाजूला करून एखाद्या गोशाळेमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे व नागरीक व जनावरे या दोघांचेही आरोग्याचे रक्षण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

शेजारधर्म

BRICS Summit 2026 : “शेजारधर्म पाळूया”; मोदी-जिनपिंग भेटीआधी चीनचा भारताला मोठा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८व्या BRICS शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान...