श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर बाजार समितीमध्ये (Shrirampur Market Committee) बुधवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला (Onion) पंधराशे पर्यंत भाव मिळाला. बुधवारी बाजार समितीमध्ये बटाटा आवक (120, क्विंटल) 800 ते 1500 रुपयापर्यंत दर मिळाला, आले (42 क्विंटल) 1500 ते 2500, कोबी (25 क्विंटल) 300 ते 500, फ्लावर (27 क्विंटल) 400 ते 600, हिरवी मिरची (22 क्विंटल) 3500 ते 4500, चिंच (421 क्विंटल) 2000 ते 5500, टरबूज (75 क्विंटल) 700 ते 1000, खरबूज (33 क्विंटल) 1500 ते 2500, मेथी (4350 जोडी) 500 ते 900 रुपये शेकडा दर मिळाला.
कांद्याची 1780 गोणी आवक झाली. नंबर 1 कांद्याला (Onion) 1250 ते 1500 रुपये, नंबर 2 कांद्याला 1000 ते 1200 व नंबर 3 कांद्याला 750 ते 950 रुपये भाव मिळाला. लुज कांद्याची 74 वाहने दाखल झाली. नंबर 1 कांद्याला 1300 ते 1450 रुपये, नंबर 2 कांद्याला (Onion) 1000 ते 1250 व नंबर 3 कांद्याला 805 ते 950 रुपये तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1100 ते 1300 पर्यंत भाव मिळाल्याची माहिती समितीचे सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.