Wednesday, February 4, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदावर एकनाथ शिंदे शिवसेनेचा दावा

Shrirampur : श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदावर एकनाथ शिंदे शिवसेनेचा दावा

पत्रकार परिषदेमध्ये माजी खा. लोखंडे यांची माहिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथील शिवसेनेच्या उमेदवारला नंबर दोनची मते मिळाली होती. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी प्राधान्याने शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही मागणी शिंदे शिवसेना गटाचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी केली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, सागर बेग, सिद्धार्थ मुरकुटे, संजय छल्लारे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, शिवसेना शहरप्रमुख उमेश पवार, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, तालुका प्रमुख प्रदीप वाघ, संतोष डहाळे, युवा नेते नीरज मुरकुटे, राजश्री होवाळ, शरद भणगे, सिध्दांत छल्लारे, गणेश छल्लारे, सदाशिव उंडे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

माजी खा. सदाशिव लोखंडे पुढे म्हणाले की, महायुती म्हणून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाइं यांच्यामध्ये समाधानकारक जागा वाटप झाले पाहीजे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या येथील उमेदवाराला नंबर दोनची मते मिळाली होती. त्यामुळे महायुती करताना पहिले प्राधान्य शिवसेनेला द्यावे, नगराध्यक्षपदाचा उमेदवारही प्राधान्याने शिवसेनेचाच असावा, तसेच नगरसेवकांच्या 34 जागांमध्येही शिंदे शिवसेनेला प्राधान्य देण्यात यावे, जागा वाटप समाधानकारक न झाल्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदासह पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे माजी खा. लोखंडे यांनी यावेळी सांगितले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...