Wednesday, January 7, 2026
HomeनगरShrirampur : अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूरसाठी कटिबद्ध

Shrirampur : अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूरसाठी कटिबद्ध

श्रीरामपूर येथील आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पुढील काळात शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहराला हरित करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामाचा आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जलजीवन मिशनचे काम करताना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाईप खराब होऊ नयेत, यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणार्‍या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांच्या, अनियमिततेची चौकशी करावी, त्रुटींची दुरूस्ती करून पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात, ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत, त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player

महावितरण कामांचा आढावा घेतांना ना. विखे पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकर्‍यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसूम आणि मागेल त्याला सोलर पंप या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना तात्काळ सोलर पंप वितरीत करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे वीज दिली जाणार आहे. तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावामध्ये करण्यात येणार्‍या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...