श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 2 भागातील काजीबाबा रोड परिसरात राहणार्या व्यापार्याची मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत असलम कुरेशी (वय 56, रा. काजीबाबा रोड, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्या घरासमोर लावलेली मोटारसायकल कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणता तरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन जाळून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- Advertisement -
यात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत.