Wednesday, May 21, 2025
HomeनगरShrirampur : पालिकेच्या अधिकार्‍यांनी गुंडाळली अतिक्रमण मोहीम

Shrirampur : पालिकेच्या अधिकार्‍यांनी गुंडाळली अतिक्रमण मोहीम

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर नगर पालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन आहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम धडाकेबाज अतिक्रमण मोहीम सुरू केली. सरकारी जागेवरील अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आले. सामान्य जनतेनेही अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत केले. रस्ते अतिक्रमण मुक्त दिसत होते, पिण्याचे पाईपलाईन, गटाराची कामे तातडीने सुरू केली जातील, त्याचबरोबर लाईटचे खांब मागे घेऊन, या ठिकाणी रस्ताही केला जाईल. ज्यांची अतिक्रमणे काढली, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी दिला होता, मात्र, काय झाले समजले नाही. आठ दिवसानंतर अतिक्रमण मोहीम गुंडाळण्यात आली, त्यामुळे श्रीरामपूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याची अधिकार्‍यांची गर्जना हवेत विरली आहे.

अतिक्रमण काढताना काहींवर अन्याय झाला. तर काहींना न्याय मिळाला. अतिक्रमण काढली पण कचरा घाण, डबर, माती आहे त्या जागेवर आहे. उर्वरित अतिक्रमण कधी निघणार हे नगर पालिका नागरिकांना सांगत नाही. ज्यांची अतिक्रमणे काढायची आहे, त्यात प्रामुख्याने गुरुनानक मार्केटचा समावेश आहे, तेथील दुकानदारही संभ्रमावस्थेत आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणे काढली. परंतू, रामनवमीनंतर पुन्हा अतिक्रमणे पूर्ववत होऊ लागली, गोंधवणी रस्त्यावर अजूनपर्यंत गटारीची व पाईपलाईनचे काम सुरू झाले नाही, पोल सिफ्टिंग व रस्ता लांबच आहे. संगमनेर-नेवासा रस्त्यावर अशीच परिस्थिती आहे. मेनरोडवरील अतिक्रमणे हटवली, पण गटारी व पाण्याची पाईपलाईन केली नाही, विजेचे पोल केव्हा सिफ्ट होणार, याची भविष्यवाणी आता अधिकारी करत नाही.

न्यायालयाच्या आदेशाने मेनरोडवरील बहुचर्चित अतिक्रमणे हटवली. परंतु दोन दिवसांनी या ठिकाणी वजनदार व्यावसायिकाने भर रस्त्यात अतिक्रमण करून पत्र्याचे कंपाऊंड ठोकले, तक्रारी होऊनही आजही अतिक्रमण कायम आहे. एसटी स्टँड जवळील अतिक्रमणे आता पक्क्या स्वरूपात उभे होत आहे. कधीकधी तर एसटीला आत मध्ये येताना व बाहेर जाताना तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना कसरत करावी लागते, त्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणार्‍या काळ्या पिवळ्या गाड्यासह हातगाड्यांची मोठी गर्दी असते. याकडे नगरपालिका व पोलीस यांचे दुर्लक्ष आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यामागचे कारण काय? याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, याबाबत श्रीरामपूरातील नागरिक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भेटणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

खेडगाव, शिंदवडला ढगफुटी सदृश्य पाऊस; नद्यांना पूर

0
दिंडोरी / खेडगाव । प्रतिनिधी / वार्ताहर Dindori / Khedgaon आज (20) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खेडगाव, शिंदवड, दिंडोरी, रणतळे शिवार, वनारवाडी, तळेगाव दिंडोरी परिसरात...