Saturday, October 24, 2026
HomeनगरShrirampur : सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक

Shrirampur : सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्यातील 18 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी उपविभागामध्ये कार्यरत असताना गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले सोमनाथ वाघचौरे यांची आता श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी, संगमनेर या तीन उपविभागात अनेक वर्षे पोलीस उपअधीक्षक असताना सोमनाथ वाघचौरे यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख झाली होती. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. सध्या राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं.5) दौंडचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता ते श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर येत आहेत. ते लवकरच पदाची सुत्रे हाती घेणार आहेत.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...