Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यात 7 कट्ट्यांसह 14 गुन्हेगार जेरबंद

श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यात 7 कट्ट्यांसह 14 गुन्हेगार जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (Newasa), श्रीरामपूर (Shrirampur)व राहुरी (Rahuri) या तालुक्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन (Police combing operation) राबवले. यात पोलिसांनी 14 गुन्हेागारांना जेरबंद (Arrested) करतानाच त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे (Gavathi Katta) , 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी (Sword) हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 14 गन्हेगारांना जेरबंद करत 7 गावठी कट्टे, जिवंत काडतुसे असा 2,13,900/-रु. किमतीची अवैध शस्त्रे जप्त हस्तगत केली आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदर गुन्हेगारांचे उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर व आमदनगर यांच्याकडून त्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील (Sp Manoj Patil), अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (Saurabh Kumar Agarwal), अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक़ बाजीराव पोबार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक़ अनिल कटके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस निरीक्षक मसूद खान, पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सपोनि रामचंद्र करपे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

त्यानंतर काल 29 जुलै रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यामध्ये कारवाई घेत 81 गुन्हेगारांच्या घरझडत्या घेऊन अवैध शस्त्राचा शोध घेण्यात आला.

यात अशोक उर्फ देवा जालिंदर लष्करे, रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा, रितेश पुनमचंद साळवे, रा. मक्तापूर, ता. नेवासा, शुभम विश्वनाथ गर्जे, रा. बडुले, ता. नेवासा, लक्ष्मण सहादू अडांगळे, रा. गंगानगर, ता. नेवासा, शाहरुख युनूस पटेल, (वय-25) रा. संजयनगर, वॉर्ड नं. 2. श्रीरामपूर, किरण रामू धोत्रे, रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 3, श्रीरामपूर, अनिल बाळू इरले, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, केलास रामू धोत्रे, रा देवळाली प्रवरा, ता. राहुरी काशिनाथ बबन शिंदे, (वय-35), रा. बेवाडी, सावेडी, अहमदनगर, शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, रा. घोडेगाव, झोपडपट्टी, ता. नेवासा, अनिल कचरु साळुंके, गंगापूर, जि. औरंगाबाद, मयुर दिपक तावर, श्रीरामपूर, नागेश पाराजी जाधव, देवळाली प्रवरा ता. राहुरी, सिध्दार्थ अशोक नवले (गंगापूर)या वरील नमुद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतूसे व 3 तलवारी असा एकूण 2,13,900/-रु. किं. ची अवैध शस्त्रे जप्त करण्यात आलेली असून सदर बाबत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपींविरोधात यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, मारामारी (Beating), खुनाचा प्रयत्न (Murder Try), अवैधरित्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, दरोडयाची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अशोक उर्फ देवा जालिंदर तकरे, याचेविरुध्द दाखल गुन्हे- नेवासा 324, 307, 143, 323 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25, शनिशिंगणापूर पो.स्टे. भादंवि कलम 307 असे गुन्हे दाखल आहेत.

रितेश पुनमचंद गाजणे,याचेविरुध्द नेवासा 397, 357, आर्म अ‍ॅक्ट कलम 25, 4) कलम 376, 363, शुभम विश्वनाथ गर्जे, रा. बद्दले, ता. नेवासा याचे विरुध्द नेवासा पो.स्टे. 143, 323 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25, 354, 395, 307, 188 गुन्हे दाखल आहेत.

लक्ष्मण सहादू अडागळे, रा. गंगानगर, ता. नेवासा याचेविरुध्द नेवासा आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25, 379 गुन्हे दाखल आहेत. शाहरुख युनूस पटेल, रा. संजयनगर, श्रीरामपूर याचेविरुध्द श्रीरामपूर शहर पो. 307 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 दाखल गुन्हे आहेत.

काशिनाथ बबन शिंदे, रा. वैदूवाडी, सावेडी, अ.नगर तोफखाना भादवि कलम 343, 347, 336, 504, कलम 324, 323, 504, 506, म.ज.का.कलम 12(अ) प्रमाणे, म.ज.का.कलम 12(अ) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. शाहरुख उर्फ चाड्या जावेद शेख, रा. घोडेगाव, ता. नेवासा याचे विरुध्द एमआयडीसी कलम 395, 397, 427 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25, सोनई, 354, 323, 324, 324, 504, 506, कलम 399, 402, कलम 143. 147, 148,149, सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25, सोनई कलम 395, 394

- Advertisment -

ताज्या बातम्या