Saturday, February 15, 2025
Homeनगरश्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-परळी रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेण्याची मागणी

श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-परळी रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेण्याची मागणी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

बेलापूर (श्रीरामपूर)-नेवासा-शेवगाव-परळी या रेल्वे मार्गाचे 1922 साली सर्व्हेक्षण होऊन त्यासाठी 45 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. शेवगावपर्यंत जुन्या नकाशात हा रेल्वे मार्ग दर्शविण्यात आलेला आहे. आजही शेवगाव शहरात या रेल्वे मार्गाच्या भरावाच्या खुणा स्पष्ट दिसून येतात. आज शंभर वर्षाच्या कालावधीनंतरही लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रेल्वे मार्ग होऊ शकला नाही.

- Advertisement -

यासाठी माजी खा. स्व. बाळासाहेब विखे पाटील, माजी स्व.खा. दिलीप गांधी, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनीही प्रयत्न केलेले आहेत. आता या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न होऊन तो कार्यान्वित झाल्यास या भागाचा मोठा आर्थिक विकास होणार आहे.

ब्रिटीशकालीन प्रस्तावित असणार्‍या या रेल्वेच्या मार्गावर मुळा सहकारी साखर कारखाना, ज्ञानेश्वर साखर कारखाना, केदारेश्वर साखर कारखाना, गंगामाई साखर कारखाना तसेच गेवराई तालुक्यातील गढी येथील साखर कारखाने येत असल्याने ऊस वाहतुकीच्यादृष्टीने व व्यापाराच्यादृष्टीने हा रेल्वे मार्ग फायद्याचा ठरणार आहे. त्याच बरोबर या रेल्वे मार्गावर देशभर प्रसिद्ध असणारे शनिशिंगणापूर, देवगड, त्याच बरोबर पैठण येथील एकनाथ महाराज मंदिर, आपेगाव येथील संत ज्ञानेश्वरांची जन्म भूमी, नेवाशाचे ज्ञानेश्वर मंदिर, तसेच मुंगी येथील निम्बार्कचार्य मंदिर, जवळच लागून असणारे मढी येथील कानिफनाथ मंदिर, मोहटा देवी मंदिर, भगवानगड या सारख्या तीर्थक्षेत्राचा विकासही या रेल्वे मार्गामुळे होणार आहे.

भारतात एक नंबरवर असणारे सपाटीवरील जायकवाडी धरण व पक्षी अभयारण्य या निसर्ग सौंदर्याचा निसर्ग प्रेमींना भेट देणे सोपे होईल. शेवगाव तालुक्यातील पूर्व भाग तसेच नजीकच्या पाथर्डी तालुक्यातील त्याच बरोबर गेवराई तालूक्यातील असणारा दुष्काळी भाग या भागातील औद्योगिक प्रगती या रेल्वे मार्गाने साधने सहज सोपे होईल. या रेल्वे मार्ग या भागातील सांस्कृतिक, आर्थिक व औद्योगिकदृष्टीकोनातून अत्यंत किफायतशील ठरणार असून यामुळे हजारोंना रोजगार निर्माण होणार आहे.

या रेल्वे मार्गासाठी कुकाणा येथील तत्कालीन युवकांनी वेळोवेळी आंदोलने केले. तसेच जिल्हाधिकारी नगर यांचे कार्यालयासमोर या रेल्वे मार्गासाठी धरणे आंदोलने केले होते. स्वातंत्र्यानंतर सातत्त्याने नगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील असणार्‍या शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड हे तालुके विकासाच्यादृष्टीने दुर्लक्षित राहिले असून हा रेल्वे मार्ग व्हावा, म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार व जागृत कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून जनआंदोलन उभे केल्यास हा रेल्वे मार्ग कार्यान्वित होईल अशी माहिती बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचे निमंत्रक चंद्रकांत कर्डक यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या