Tuesday, April 1, 2025
Homeनगरश्रीरामपूरचे मुख्याधिकारी बी. सी. गावितांवर गुन्हा

श्रीरामपूरचे मुख्याधिकारी बी. सी. गावितांवर गुन्हा

माजलगावात 1 कोटी 44 लाखांचा अपहार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माजलगाव नगरपरिषदेचे तत्कालीन व श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्यासह तीन जणांवर माजलगाव नगरपरिषदेमध्ये 1 कोटी 44 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

माजलगाव शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्याकामी आलेल्या निधीचा तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित यांनी संगनमत करून तत्कालीन लेखापाल अशोक भीमराज कुलकर्णी, सल्लागार स्थापत्य अभियंता महेश कुलकर्णी यांनी काँक्रिट रोड नाल्यांच्या बावीस शासकीय कामांची बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी आहेत, अशी माहिती असताना सुध्दा त्याचा वापर करून शासनाची 1 कोटी, 44 लाख, 29 हजार, 959 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.

याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावित यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुलेमान सय्यद करत आहेत. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन स्विचऑफ आला, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

देवळालीचे लाच प्रकरण, राहात्याचा कार्यभार..
देवळालीचे तत्कालीन मुख्याधिकारी नानाभाऊ महानवार यांना तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याचा संदर्भ राहाता शहरातील पालिकेचा स्वच्छतेच्या ठेक्याबाबत होता. त्यावेळी राहात्याच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार गावित यांच्याकडे होता.त्यांच्याकडून संबंधित कंपनीची अडवणूक केली जात होती. या लाचप्रकरणात गावित यांचे नाव आल्याने त्यांना काही दिवस कार्यमुक्त करण्यात आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये उफाळणार नवा वाद;...

0
नाशिक | Nashik येथे २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela) होणार असून या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. परंतु, त्याआधीच साधू-संतांमध्ये नामकरण आणि...