श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा मार्केटमध्ये कांदा 3500 रुपये तर सोयाबीनला 5200 रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे.
मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची काल दि. 3 रोजी 15292 गोणीतून एकूण 8392-24 क्विंटल आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 2300 ते जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 1350 ते 2250 व नंबर 3 कांदा 300 ते 1300 क्विंटल तसेच गोल्टी कांदा 1400 ते 1800 रुपये क्विंटलने विकला गेला. भुसार मार्केटमध्ये एकूण 136 क्विंटल मालाची आवक झाली.
गव्हाची 11 क्विंटल आवक होऊन 2000 ते 2400 व सरासरी 2350 रुपये क्विंटल, हरबर्याची 6 क्विंटल आवक होऊन 4000 ते 4300 व सरासरी 4150 रुपये क्विंटल तर सोयाबीनची 75 क्विंटल आवक होऊन 4100 ते 5200 व सरासरी 5000 रुपये ज्वारीची 1 क्विंटल आवक होऊन 2400 तर मक्याची 42 क्विंटल आवक होऊन 1400 ते 1900 व मुगाची 1 क्विंटल आवक होऊन 6000 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.