Sunday, September 8, 2024
Homeनगरश्रीरामपुरात कांदा 5400 वर

श्रीरामपुरात कांदा 5400 वर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल 14 हजार 573 कांदा गोण्यांची आवक होऊन 600 ते 5400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लिलावात एक नंबर कांदा 4000 ते 5400, दोन नंबर कांदा 2500 ते 4000, तीन नंबर कांदा 700 ते 2500, गोल्टी कांदा 3500 ते 4800 याप्रमाणे दर मिळाला. तर मोकळा (लुज) कांद्याच्या 173 साधनांची आवक होऊन 2300 ते 5410 रुपये दर मिळाला.

- Advertisement -

एक नंबर कांदा 4350 ते 5410, दोन नंबर कांदा 3300 ते 4300, तीन नंबर कांदा 2300 ते 3250 तर गोल्टी कांद्यास 3600 ते 4350 याप्रमाणे दर मिळाला. लिलावात 516 कांदा गोणीस 5000 ते 5400, 1476 कांदा गोणीस 4500 ते 4000 तर 3345 कांदा गोणीस 4000 ते 3500 रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या