Friday, June 19, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदही खुले

Shrirampur : श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदही खुले

अनेक इच्छुकांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदा पाठोपाठ तालुका पंचायत समिती सभापती पदही खुले झाले आहे. आता गेल्या चार वर्षाचा वनवास संपणार असून सभापतीपद खुले झाल्याने अनेक इच्छुकांच्या भाऊगर्दीत वाढ झाली आहे. गणनिहाय उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनाही मोठी कसरत करावी लागणार आहे.

- Advertisement -

काल मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये सभापतीपद खुले झाले आहे. 2016 मध्ये मागील पंचायत समिती निवडणूका पार पडल्या होत्या. त्यावेळी अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसचे चार सदस्य तर चार सदस्य विकास आघाडीचे निवडून गेले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती पद हे अडीच अडीच वर्षासाठी वाटून घेण्यात आले होते. परंतू आता राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठे बदल घडून आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केल्याने स्थानिक पातळीवर काय बदल घडतात हे पहाणे औसुक्याचे ठरणार आहे.

2016 मध्ये सभापती पद हे सर्वसाधारण जागेसाठी खुले होते. मात्र 2018 मध्ये ओबीसी महिलेसाठी राखीव झाले होते. त्यावेळी सभापती पद निवडीसाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सोमवारी निघणार्‍या जि.प. गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या आरक्षण सोडतीनंतरच पंचायत समिती निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...