श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने साक्षीदार असलेल्या दोघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी हा एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. याच गुन्ह्यातील दोन साक्षीदार पोलीस स्टेशन परिसरात उभे होते. हे कळताच हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आपल्या काही सहकार्यांसह अचानक आला. त्याने या दोघांना जबर मारहाण केली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. या जखमी साक्षीदारांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचेे काम सुरू होते.




