Saturday, April 25, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

Shrirampur : श्रीरामपुरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईदुल-फित्र अर्थात रमजान ईद काल शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी मुफ्ती मोहम्मद रिझवानुल हसन यांचे ओजस्वी असे प्रेम, स्नेह आणि समाजात आपुलकी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे वर्तन प्रत्येकाकडून व्हावे, असे अभिप्रेत करणारे प्रवचन झाले. इस्लामने सामाजिक समस्यांचा पुरस्कार केला असून सर्वांनी जाती धर्मविरहित एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे. एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी झाले पाहिजे. शेजार धर्म पाळताना सर्वांनीच एकमेकाला मदतीची भावना ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ईद निमित्ताने उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपला देश बहुधर्मीय आणि बहुभाषीक आहे. येथे विविध चालीरिती, परंपरा असणारे लोक एकत्र राहतात. कुणी किती विरोध केला. तरी आपण आपला माणुसकी धर्म सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

शहर काझी मौलाना सय्यद अकबरअली यांनी ईदच्या नमाजची इमामत केली. जामा मशीद इथेही ईदची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे खतीब व इमाम हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली यांचे यावेळी प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी इमामत केली. जामा मशिदीत आलेल्या मान्यवरांचे स्वागत विश्वस्त डॉ.राज शेख, तनवीर रजा, मोहसीन बागवान, मुख्तार शाह यांनी केले. याशिवाय शहरातील बहुतांश मशिदीतूनही ईदची नमाज अदा करण्यात आली.

जामा मशीद व ईदगाह मध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आ. हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, निरज मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, लकी सेठी, नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र पवार, दीपक वमने, डॉ.दिलीप शिरसाठ, रितेश एडके, महेंद्र त्रिभुवन, अरुण मंडलिक, सत्यनाथ शेळके, रवी भांबारे, किशोर त्रिभुवन, विजय खाजेकर, पत्रकार नितीन चित्ते, जयेश सावंत, दीपक कदम यांच्यासह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ईदच्या नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख, याकुब बागवान, सलीम शेख, अश्फाक शेख व इतर सदस्यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींनी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदच्या नमाजनंतर सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेतला. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक तसेच 11 पोलीस उपनिरीक्षक व सुमारे 125 पोलीस, होमगार्ड, आरसीपी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले.

‘सार्वमत’चे आभार
गेले महिनाभर रमजान महिन्याचे सहेरी व इफ्तारचे वेळापत्रक दररोज प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सार्वमतचे जामा मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे मौलाना इमदाद अली व डॉ. राज शेख तसेच ईदगाह कमेटी व मुस्लिम पंचायततर्फे नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी अभिनंदन करून आभार मानले. या निमित्ताने जामा मशीदीत ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...