Tuesday, March 25, 2025
Homeनगरश्रीरामपूर आरटीओ कार्यालय हद्दीतील शिरसगाव रस्ता बंद होणार

श्रीरामपूर आरटीओ कार्यालय हद्दीतील शिरसगाव रस्ता बंद होणार

पर्यायी मार्गाचा वापर करा || ग्रामपंचायतला दिला पत्राद्वारे इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शिरसगाव हद्दीत असून या कार्यालयासाठी 3.55 हेक्टर जागा दिलेली आहे. कार्यालयासमोरील रस्त्याचा वापर शिरसगावकडे जाण्यासाठी केला जातो. या रस्त्याची मालकी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहे. ग्रामपंचायतीसाठी पर्यायी रस्ता असून त्याचे काम करुन तो वापरला जावा, सध्याचा रस्ता बंद करण्याचा इशारा परिवहन कार्यालयाने शिरसगाव ग्रामपंचायतीला पत्राद्वारे दिला आहे. श्रीरामपूर शहरालगतच्या शिरसगाव परिसरात गट नंबर सात मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. कार्यालयास 3.55 हेक्टर जागा शासनाच्यावतीने दिलेली आहे.

- Advertisement -

कार्यालयासमोरून जाणारा डांबरी रस्ता शिरसगावकडे जाण्यासाठी वापरला जातो. परंतु, उपविभागीय परिवहन कार्यालयास शासनाने दिलेल्या 3.55 जागेतूनच हा रस्ता जातो. या रस्त्याच्या जागेच्या मालकीसह मोजून जागा ताब्यात दिलेली असून या रस्त्याचे मालकी हक्क देखील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्यात आले आहेत. आरटीओ कार्यालयास दिलेल्या जागेच्या सातबारा उतार्‍यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असल्याने हा रस्ता बंद करणे बंधनकारक आहे. सध्याचा शिरसगावकडे जाणारा हा रस्ता अनाधिकृत असून तात्पुरत्या वहिवाटीचा असल्याचे भूमिलेख, श्रीरामपूर यांच्या मोजणीच्या नकाशात स्पष्ट उल्लेख आहे.

शिरसगाव कडे जाण्यासाठी आरटीओ जागेच्या बाहेरून अधिकृत गाव रस्ता असून गाव नकाशात दाखवलेले आहे. त्यास शिरसगाव निपाणी वडगाव हा रस्ता म्हटले आहे. त्यास रस्ते विकास योजना भुसार ग्रामीण मार्ग 90 चा दर्जा आहे. शिरसगाव निपाणी रस्ता गट नंबर सात व गट क्रमांक 29/1 च्या बांधावरून शिरसगावकडे जातो. सदरचा रस्ता हरेगाव रोडपासून पुढे सुमारे सातशे मीटर पर्यंत रस्त्याचे काम झाल्यास पुढे आरटीओ कार्यालय समोरून जाणार्‍या रस्त्यास मिळतो व शिरसगावकडे जाण्यासाठी बाहेरून अधिकृत वहिवाट होऊ शकते. शिरसगाव ग्रामपंचायतकडे आरटीओ कार्यालयाने यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सदर रस्त्याचे काम करून घेण्याचे सुचविले आहे. सध्याच्या वहिवाटीचा रस्ता कार्यालयाच्या सुरक्षेसाठी तसेच नवीन होणार्‍या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, चाचणीसाठी बंद करण्यात येणार आहे.

त्यामुळे शिरसगाव ग्रामस्थांची गैरसोय झाल्यास त्यास आरटीओ कार्यालय जबाबदार राहणार नाही, असेही इशारा पत्रात म्हंटले आहे. त्यामुळे शिरसगाव ग्रामपंचायतने शिरसगाव-निपाणी वडगाव गट नंबर सात व गट नंबर 29/1 च्या बांधावरून जाणार्‍या रस्त्याचे काम करून घ्यावे, याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर तसेच जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांनाही पत्रव्यवहाराद्वारे कळविले असल्याचे उपप्रादेशिक परिवहनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

परिवहन कार्यालयासमोरील रस्ता हा आरटीओच्या हद्दीत असल्याने त्याला पर्यायी रस्ता येथील गट नंबर 7 व 29/1 च्या बांधावरून आहे. या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरू आहे. कालच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा झाली असून लवकरच या रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न आहे.
– गणेश मुदगुले, तालुकाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...