Saturday, July 27, 2024
Homeनगरश्रीरामपूर आरटीओ अधिकार्‍यांच्या कामात अडथळा

श्रीरामपूर आरटीओ अधिकार्‍यांच्या कामात अडथळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक टेस्ट ट्रॅकवर गाडी घेऊन येत असताना तेथे एका तरुणाने आपली मोटारसायकल घालून माझी गाडी अगोदर चेक करा म्हणत कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत दि. 15 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुनील भाऊसाहेब गोसावी, अतुल गावडे, गणेश राठोड, विकास लोहकरे, श्रीमती शितल तळपे, श्रीमती सुजाता बाळ सराफ, रोहीत पवार (सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) असे सर्वजण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे कामकाज परिवहन कार्यालयासमोरील टेस्ट ट्रॅकवर गाड्यांची तपासणी करत असताना त्यावेळी दुपारी 4.15 च्या सुमारास सहा. मोटार वाहन निरीक्षक रोहीत पवार यांना एक वाहन ब्रेक टेस्ट करण्याकरिता टेस्ट ट्रॅकवर चालवत घेऊन येण्यास सांगितले.

तेव्हा पवार हे वाहन टेस्ट ट्रॅकवरून चालवत घेऊन येत असताना एक आरिफ नावाचा तरुण त्याची मोटारसायकल टेस्ट ट्रॅकवर आडवी लावून पवार चालवित घेऊन येत असलेल्या ब्रेक टेस्ट करण्याच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. तेव्हा आरिफ यास तुम्ही ट्रॅकवरून मोटारसायकल बाजूला काढा, असे सांगितले असता त्याने माझी गाडी अगोदर चेक करून घ्या, असे म्हणून टेस्ट ट्रॅकवर मोटारसायकल तशीच उभी करून कामकाजात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुनील भाऊसाहेब गोसावी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी मोटारसायकल क्र. एमएच 17 एक्स 1045 वरील चालक आरिफ (पुर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात भादंवि कलम 341, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या