Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयास सलग तिसर्‍यांदा कायाकल्प पुरस्कार

श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयास सलग तिसर्‍यांदा कायाकल्प पुरस्कार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालय मुल्यांकनास देश व राज्य पातळीवर पात्र ठरले असून

- Advertisement -

त्यामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे. 2019-2020 या वर्षाचा स्वच्छ भारत अभियान अंतगत कायाकल्प पुरस्कार मिळविणारे श्रीरामपूरचे ग्रामीण रुग्णालय राज्यात सलग तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. सलग तिसर्‍यांदा राज्यात व देशात प्रथम येणारे ग्रामीण रुग्णालय एकमेव ठरले आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील व राज्यात सर्व आरोग्य संस्थामध्ये कायाकल्प योजना राबविली जाते. सामान्य गरजु, गरुब रुग्ण व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देशाचे आरोग्य संस्था, स्वच्छ, सुंदर, पारदर्शक गुणवत्तावर्धक व संक्रमणरहित रुग्णसेवा समितीमार्फत मुल्यांकन करण्यात येते. यात जिल्हा रुग्णालय स्तर, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय स्तर, स्त्री रुग्णालय स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र याचा समावेश आहे.

श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयास राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल अपकिप, सॅनिटेशन अ‍ॅड हायजीन, वेस्ट मॅनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल, हायजीन प्रमोशन, सपोर्ट सर्व्हिसस, बियाँड हॉस्पिटल हे सर्व निकषावर स्पर्धेचे पुरक्षण करुन मुल्यांकन देण्यात आले आहे. या निकषात मुल्यांकनास देश व राज्य पातळीवर पात्र ठरले असून त्यामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.

2019-2020 या वर्षाचा स्वच्छ भारत अभियान अंतगत कायाकल्प पुरस्कार मिळविणारे श्रीरामपूरचे ग्रामीण रुग्णालय राज्यात सलग तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळविला आहे. सलग तिसर्‍यांदा राज्यात व देशात प्रथम येणारे ग्रामीण रुग्णालय एकमेव ठरले आहे.

याअगोदर या ग्रामीण रुग्णालयाने देश व राज्यपातळीवर पात्र ठरत 2017-2018 व 2018-2019 या दोन वर्षीत सलग दोनवेळा पुरस्कार मिंळविले आहे.आता हा तिसर्‍या वर्षी सलग तिसर्‍यांदा पाप्त करुन सलग तिसर्‍यांदा पुस्कार मिळविणारे राज्यात व देशात प्रथम येणारे एकमेव ग्रामीण रुग्णालय ठरले आहे. या पुरस्काराचे स्वपि 15 लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मिळणार आहे.

सदरचा पुरस्कार जनता, लोकप्रतिनिधी, रुग्णालयात अधिकारी व रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळेच मिळाला आहे. हा पुरस्कार सर्वसामान्य जनतेस समर्पित करण्यात येत आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंत के. जमधडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या