Sunday, May 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरात स्टॉलधारकांमध्ये हाणामारी

श्रीरामपुरात स्टॉलधारकांमध्ये हाणामारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिपावली निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या विविध वस्तू विक्रीच्या स्टॉल पैकी दोन स्टॉलधारकांमध्ये पाणी उडाल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या परस्पर विरोधी फिर्यादींवरून दहा जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिस ठाण्यातही हाणारा -झाल्याने पोकॉ गौतम लगड यांच्या फिर्यादीवरून सहा जणांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील राम मंदिराजवळ निलोफर आबेद कुरेशी (वय 24), राहणार फातेमा हौसिंग सोसायटी, वार्ड नं.2 यांनी चप्पलचा स्टॉल लावलेला आहे. त्यांच्या शेजारी अमीर सय्यद याने लहान मुलांच्या खेळण्याच्या बंदूकी विकण्याचा स्टॉल लावलेला आहे. काल झालेल्या पावसामुळे स्टॉलजवळ पावसाचे पाणी साचले होते. हे साचलेले पाणी काढत असतांना ते चप्पच्या स्टॉलवर उडाल्याने दोन्ही स्टॉलधारकांमध्ये वादाला सुरूवात झाली. पाणी उडाल्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ होवून त्याचे हाणामारीत रूपांतर झाले.दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी या परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला.

तर याप्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हा दाखल करण्यात आला. निलोफर आबेद कुरेशी यांनी दिलेल्या फर्यादीवरून अमीर राजू सय्यद, समीर महंमद सय्यद, अमन महंमद सय्यद, नवाज महंमद सय्यद, राजू रहेमतुल्ला सय्यद, महंमद रहेमतुल्ला सय्यद, अमीर सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रूकसाना भिस्मिल्ला यांच्या फिर्यादीवरून निलोफर आबेद कुरेशी, आबेद अकबर कुरेशी, तोफिक अकबर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.

दरम्यान या प्रकरणी दोन्ही स्टॉलधारक हे परस्पर विरोधी फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. यावेळी तेथेही शिवीगाळ होत असतांना पोलिसांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र पोलीस ठाण्याचा आवारात मारहाणाचा प्रकार घडला. या हाणामारीत राजू सय्यद यांच्या डोक्यात खुर्ची मारण्यात आल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. या प्रकरणी पोकॉ गौतम लगड यांच्या फिर्यादीवरून रूकसाना बिस्मिल्ला, राजू सय्यद, बिस्मिल्ला राहेमानतुल्ला सय्यद, निलोफर आबेद कुरेशी, आबेद अकबर कुरेशी, तोफिक अकबर कुरेशी, यांच्या विरोधात सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या