Wednesday, May 29, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 21 नवीन करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात 21 नवीन करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 21 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे 67 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

- Advertisement -

काल खासगीत 16 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 05 असे 21 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16686 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 16591 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर (Shrirampur) शहरात 04 तर ग्रामीण भागात 16 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-01 असे एकूण 21 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 7-01 असे 04 शहरात तर ग्रामीण भागात उक्कलगाव-02, पढेगाव-03, कारेगाव-02, ब्राम्हणगाव-01, माळेवाडी-01, माळवाडगाव-05, खानापूर-02 असे ग्रामीण भागात 16आढळून आले आहेत. बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या