Thursday, April 24, 2025
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

श्रीरामपूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. यामध्ये बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द हे सर्वसाधारण झाले असून पढेगाव, निपाणी वडगाव व वडाळा महादेव यांना अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे. भोकर, माळवडगाव, नाऊर, भोकर, भेर्डापूर यांना सर्वसाधारणमध्ये संधी मिळाली आहे. 52 गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती 13, अनुसूचित जमाती 8, इतर मागास प्रवर्ग 14 तर सर्वसाधारणला 17 जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

येथील प्रशासकीय सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे करून ही सोडत काढली. यात अनुसूचीत जातीमध्ये गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर, दत्तनगर, पढेगाव, निपाणीवडगाव, वडाळामहादेव, खानापूर, उंबरगाव, निमगावखैरी, मालुंजा बुद्रुक, लाडगाव तर अनुसुचीत जमाती – खोकर, ब्राम्हणगाव वेताळ, टाकळीभान, रामपूर, भैरवनाथनगर, माळेवाडी, वळदगांव, महांकाळवडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – भामाठाण (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), एकलहरे, गुजरवाडी, हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), जाफ्राबाद, खंडाळा, खिर्डी, शिरसगाव, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द., कान्हेगाव, कारेगाव तर
सर्वसाधारमध्ये बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, कडीत बुद्रुक, कमालपूर, माळवडगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सराला, बेलापूर बुद्रुक तसेच टाकळीभान ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जाती महिला होते ते आता अनुसूचित जमाती झाले आहे.

याठिकाणी लोकसंख्येचा निकष लावण्यात आला. भोकर या अगोदर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला होते. आता सर्वसाधारण सरपंचपद लाभले आहे. खोकर सरपंचपद अनुसूचित जाती महिला होते. आता अनुसूचित जाती सरपंच राहणार आहे. बेलापूर सरपंचपद अगोदर अनुसूचित जाती होते.आता ते सर्वसाधारण झाले आहे. तर बेलापूर खुर्द इतर मागास प्रवर्ग होते तेही आता सर्वसाधारण झाले आहे. उक्कलगाव ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जाती महिला होते.आता ती संधी इतर मागास प्रवर्गाला मिळाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील धर्मादाय...