श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्याच्या काही भागात वादळी वार्यासह (Stormy Winds) अवकाळी पावसाने हजेरी लावली. खैरी निमगाव, हरेगाव, नाऊरचा काही भाग, माळवाडगाव, मुठेवाडगाव आदी परिसरात या पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. सुमारे अर्धातास चालेल्या या पावसाने काही वेळातच पाणीचपाणी केले होते.
आज सायंकाळी वादळी वार्यासह पावसाला सुरवात झाली. वादळी वार्यासह अर्धातास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दाणादाण उडाली. खैरी-निमगाव परिसरात काही भागात मुरघासासाठी मकाची कुट्टी सुरु होती. त्याचे अचानक आलेल्या या पावसामुळे नुकसान झाल्याचे समजते. अचानक पडलेल्या पावसाने (Unseasonal Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हरेगाव, महांकाळवाडगाव, माळवाडगाव, मुठेवाडगाव आदी भगात जोरदार तर वडाळा महादेव, खोकर, भोकर यया परिसरात पावसाचा शिडकाव झाला.
किरकोळ पाऊस आला तरी भोकर परिसरात वीज पुरवठा खंडीत होणे हे नित्याचेच झाले आहे. आज सायंकाळी भोकर-खोकर परिसरात पावसाचा किरकोळ शिडकाव झाला. परंतू लगेचच वीज पुरवठा खंडीत झाला होता. वारंवार होणार्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.




