Tuesday, September 29, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात श्रीराम मंदिर चौकात एकावर जीवघेणा हल्ला

Shrirampur : श्रीरामपुरात श्रीराम मंदिर चौकात एकावर जीवघेणा हल्ला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मेन रोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये काल शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरूणावर जीवघेणा हल्ला झाला. तसेच अन्य ठिकाणीही दिवसभरात दोन हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. ऐन रामनवमी उत्सव शहरात चालू असताना या घटना घडल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

काल शनिवारी दुपारी दशमेशनगर भागात दोन गटात हाणामार्‍या झाल्या होत्या. त्यानंतर एका शाळेजवळही हाणामारीची घटना घडली. त्यानंतर मेन रोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये काल शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एकाा तरूणावर जीवघेणा हल्ला झाला. घटनेनंतर हल्लेखोर लगेचच पसार झाले. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधिक्षक जयदत्त भवार आणि पोलिस निरीक्षक देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरविली.

जखमी तरुणाला तात्काळ कामगार रुग्णालय येथे नेण्यात आले. दरम्यान जखमीला लोणीला हलवण्यात आल्याचे समजते. जखमी तरूण बेलापूरचा असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कोणत्या कारणातून या तरुणावर हल्ला झाला हे समजू शकलेले नाही. दरम्यान, रात्री उशीरा एका तरूणास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू होती.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...