Monday, November 25, 2024
Homeब्लॉगइमरजन्सी कॉन्ट्रासेप्शन पील्सचे दुष्परिणाम

इमरजन्सी कॉन्ट्रासेप्शन पील्सचे दुष्परिणाम

डॉ. शुभांगी मानेकर एमबीबीएस, डीजीओ; स्त्रीरोग तज्ञ

“मॅडम, मला दहा दिवस वर झालेत मी गोळ्या / आय पील घेतली होती मागील महिन्यात

- Advertisement -

आता काय करू ?”

“मला गर्भनिरोधक गोळ्यांची गरजच नाही, मी पील ७२ घेते अधे-मधे !”

“माझे वजन वाढतयं डॉक्टर, मी काय करू ?”

“मला अधे-मधे कधीही अंगावर जातं, काय करु मॅडम मी ?”

असे नाना विविध प्रश्न पेशंट विचारतात मग हळूच आय पील घेतल्याचे सांगतात.

Drug is a poision if not used in prescribed doses

२०- २१ वर्षांपूर्वी माझ्या रेसिडेन्सी या दरम्यान इमरजन्सी कॉन्ट्रासेप्शन वर शोध चालू होता. काही वर्षातच ह्या गोळ्या वापरात आल्या, ह्यात लेवोनॉर जेस्ट्रेल (नावाचा प्रोजेक्शन हार्मोन) १.५ एमजी आहे. ही गोळी पेशंटने (unprotected contact च्या) २४ तासांच्या आंत किंवा जास्ती जास्त ७२ तासांच्या आंत घ्यायला हवी ह्याचा ८०% ते ९०% सक्सेस रेट आहे.

मला आठवतं आधी इमरजन्सी कॉपर-टी (आययूसीडी) बसवुन द्यायचे, गर्भ टाळण्यासाठी पण हे सर्व मास पब्लीक साठी शक्य नाही, म्हणुन ई-पिल्स आल्या. त्याचा दुरुपयोग बघून मात्र आम्हा डॉक्टरांना वाईट वाटतं.

कुमारिका मुली, लीव्ह इन रिलेशन मधील स्त्रिया व इतरही बायका ह्यांचा सर्रास वापर करतात आणि मग त्याचे दुष्परिणाम होऊन ह्या डॉक्टरांकडे, त्या डॉक्टरांकडे फिरतात. आज सोनेग्राफी तर नंतर युरिन प्रेगनन्सी टेस्ट करत राहतात.

ढोबळ मानाने गोळ्यांचे दुष्परिणाम काही नाही असे जरी असले तरी नेहमी घेतल्यास ह्यांचे खालील दुष्परिणाम आहेत.

१) ही गोळी इमरजन्सी पील आहे. त्यामुळे अगदी गरज असेल तेव्हाच घ्यावी. वारंवार घेऊ नये.

२)७२ तासानंतर घेतल्यास असर होणार नाही ०-७२ तासांत घेतल्यास उपयोगी पडेल.

३) गोळी उलटीत पडल्यास, परत दुसरी गोळी घ्यावी लागेल. उलटी न व्हावी म्हणुन एक अॅन्टी- इमोटीक गोळी घेऊन, मग ही पील घ्यावी, ही गोळी जेवणानंतर घ्यावी, स्तनांमध्ये दुखणे, डोके दुखी, हे पण साईड इफेक्ट्स आहेत.

४) ह्या गोळ्या पाळीच्या पहिल्या १४ दिवसात घेण्यात आल्यास पुढचे पिरियड्स लवकर येतील. नंतरच्या १४ दिवसांत घेतल्या असल्यास पिरियड्स उशिरा येतील.

५)ह्या अॅबॉरशन पील्स नाहीत. त्यामुळे आधीच तयार झालेला गर्भ पडणार नाही.

६) ह्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या गोळ्या आहेत, त्यात गर्भनिरोधक गोळ्यांचा दहापट जास्त हार्मोन आहे

हे विसरु नये.

७) लठ्ठ स्त्रियांवर ह्या गोळीचा असर होणार नाही.

८) बऱ्याच वेळा घेतल्यास वजन वाढणे, अधे-मधे अंगावर जाणे पण होऊ शकते. Thrombo embolic episodes पण होऊ शकतील ह्याचा फेल्युअर रेट १०% ते २०% आहे. जर पाळी चुकली तर स्त्रिरोग तज्ञांना जाऊन भेटावे.

९)डॉक्टर म्हणुन मला हे सांगावे वाटतं की, ही गोळी ओ.टी.सी. न करता फक्त स्त्रीरोग तज्ञांच्या लेखी प्रिस्कीप्शननेच द्यावी. तसा नियमच बनवावा. त्यानंतरच ह्याचा अनावश्यक वापर व दुरुपयोग टळेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या