Sunday, November 24, 2024
HomeमनोरंजनSidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या काही मिनिटात...

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या काही मिनिटात २.४ मिलियन हिट्स

मुंबई | Mumbai

सिद्धू मुसेवालाचा (Sidhu Moosewala) खूप मोठा चाहतावर्ग आहे. मृत्यूनंतरही चाहत्यांकडून त्याच्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. सिद्धूचं नवीन गाणं ऐकून काही चाहते भावूकसुद्धा झाले आहेत. या गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी भावूक प्रतिक्रिया लिहिल्या आहेत…

- Advertisement -

त्याच्या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याचं प्रत्येक गाणं येताच चाहत्यांच्या ओठावर असायचे. आज तो या जगात नसला तरी एकापेक्षा एक हिट गाण्यांमुळे चाहते त्याची आठवण काढतात. नुकतंच त्याचं ‘मेरा ना’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

सिद्धूची प्रदर्शित न झालेली गाणी त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडून चाहत्यांच्या भेटीला आणली जात आहेत. ‘मेरे ना’ हे त्याचं नवीन गाणं स्टील बँग्लेज आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता बर्ना बॉयसोबत आहे. या गाण्याला अवघ्या काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

सिद्धू मुसेवालाने रिलीज केलेले ‘मेरा ना’ हे नवीन गाणे खूप पसंत केले जात आहे. ‘मेरे ना’ हे त्याचं नवीन गाणं स्टील बँग्लेज आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता बर्ना बॉयसोबत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झालेले हे त्यांचे तिसरे गाणे आहे. याआधीही त्यांची आणखी दोन गाणी रिलीज झाली आहेत.

‘मेरे ना’ या गाण्यासोबतच त्याचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धूच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. सिद्धूच्या या नवीन गाण्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे. अवघ्या 16 मिनिटांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. पुढीत सात – आठ वर्षे सिद्धूची गाणी प्रदर्शित करत राहणार असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलंय.

Twitter ची चिमणी परतली! Dogecoin ला तीन दिवसात बदलले

सिद्धू मुसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. त्यांची गाणी लोकांना खूप आवडली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्याचे चाहते त्याला भरभरुन प्रेम देत आहेत. त्याच्या या गाण्यावरही लोक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. रिलीजच्या काही मिनिटांतच या गाण्याला 2.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी गोळी मारुन हत्या करण्यात होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यांना धक्काच दिला. त्याचे चाहते आणि कुटुंब अजूनही त्याच्या मुत्यूच्या दुख:तुन बाहेर आलेले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भीषण अपघात!, तवेरा गाडी कोसळली थेट ८०० फूट खोल दरीत

राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या