Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन?

पुण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन?

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील सिंहगडा जवळील ससाणे नगर येथे गाईच्या वासरावर वाघाने हल्ला केल्याच्या घटनेने तसेच सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोंढणपूर फाट्याजवळ पर्यटक दाम्पत्याला मोटरसायकलवरून जाताना वाघ दिसल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ पट्टेरी वाघ दिसल्याने लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकांनी रात्री एकटे फिरू नये व स्वतःची काळजी घेण्यास सांगितले जात आहे

- Advertisement -

गुरुवारी संध्याकाळी ससाणे नगरचे ग्रामस्थ भगवान सणस यांच्या गाईच्या वासरावर वाघाने हल्ला केला होता. याबाबत अधिक माहिती देताना भगवान सणस म्हणाले की, अडीज ते तीनच्या सुमारास डोंगरावर गाय व वासराला चारण्यासाठी घेउ होतो. अंदाजे ३.३० ते ३.४५ दरम्यान गाय कावरी बावरी झाली होती. मला वासरू दिसत नव्हते. त्यामुळे मी पुढे गेलो व पाहिले की वाघाने वासराच्या नरड्याला पकडले होते. मी आरडाओरडा केला व मला पाहून वाघ तेथे जवळ असलेल्या ओढ्यात उडी मारून पळूण गेला. त्यानंतर गाईला व वासराला घरी घेऊन आलो. वासराच्या जखमांवर हळद लावलेली आहे. ते काही खात नाही.

दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोंढणपूर फाट्याजवळ मोटरसायकलवरून जाणाऱ्या पर्यटक दाम्पत्यालाही सिंहगडावरून खाली येताना संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास वाघ रस्ता ओलांडताना त्यांना दिसला. त्यांनी मोटरसायकलचा ब्रेक दाबून गाडी थांबवली. मागून जोरात हॉर्न वाजवत कार आल्याने वाघ तेथून पळून गेला. त्यानंतर त्यांनी हवेली पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या वतीने सिंहगड परिसरातील डोणजे, गोळेवाडी, खानापूर, अक्तरवाडी, मालखेड, घेरासिंहगड, सोलापूर व इतर गावात जनजागृती आता करण्यात येत आहे. वन विभागाने व पोलिसांनी सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले जाहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या