Wednesday, November 11, 2026
HomeनाशिकNashik News: शहर परिसरात वातावरणात मोठा बदल; दिवसा कडक ऊन, रात्री गारवा,...

Nashik News: शहर परिसरात वातावरणात मोठा बदल; दिवसा कडक ऊन, रात्री गारवा, आठवडाभरात किमान तापमानात घसरण

नाशिक | प्रतिनिधी
शहरातील वातावरणात सध्या मोठा बदल जाणवू लागला आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. रात्री अकरानंतर हवेत गारवा जाणवू लागला असून, अवघ्या आठवडाभरात शहराच्या किमान तापमानात तब्बल आठ अंशांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. या बदलत्या वातावरणामुळे नाशिककरांना आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे.

परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढला होता. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आता ऋतुमानात बदल होण्यास सुरुवात झाली असून रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. सोमवारी (दि. २) नाशिकचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर तापमानात सातत्याने घसरण होत रविवारी (दि. ८) किमान तापमानाचा पारा थेट १४.२ अंशांवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या सात दिवसांत किमान तापमानात ७.८ अंशांची घट झाली आहे. दुसरीकडे कमाल तापम ान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान असल्याने दिवसा उन्हाचा प्रभाव कायम आहे.

- Advertisement -

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिककरांवर अग्नितांडवाचे सावट; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ आगीच्या घटना

थंडीचा जोर वाढणार
दिवाळीच्या काळात घरोघरी होणारी पणत्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, दिवाळीचा उत्सव आटोपल्यानंतर लगेचच थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आरोग्याची काळजी घ्या!
दिवसा उष्णता आणि रात्री थंडी असा वातावरणातील विरोधाभास निर्माण झाल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. ऋतुमानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी आहार-विहारात योग्य बदल करावेत. रात्री घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

आठवडाभरातील किमान – कमाल तापमान
सोमवार (दि. २) २२ २८.४
मंगळवार (दि. ३)१८.३ ३३.३
बुधवार (दि. ४)१८.२ ३४
गुरवार (दि. ५) १८.२ ३३.९
शुक्रवार (दि. ६)१७.३ ३२.३
शनिवार (दि. ७) १५ ३३
रविवार (दि. ८)१४.२ ३२.९
सोमवार (दि. ९)१४.३ ३२.३

ताज्या बातम्या

Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर खा. राऊतांचं टीकास्त्र...

0
मुंबई | Mumbai गोकुळच्या अध्यक्षपदावरुन राजकीय युद्ध रंगले आहे. काल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसच्या सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर सडकून टीका...