Saturday, July 27, 2024
Homeजळगावजिल्हा परिषदेत पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे संकेत?

जिल्हा परिषदेत पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे संकेत?

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena’s Urban Development Minister Eknath Shinde) यांच्यासह 40 समर्थक आमदारांनी बंडखोरी (MLAs revolt) केल्याने त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सहयोगी आमदारांसह शिवसेनेचे चार आमदार (Four Shiv Sena MLAs) शिंदे गटात (Shinde group) दाखल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग (Accelerate political developments) आला असून राजकीय समीकरणे बदलाचे संकेत मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) भाजप-शिवसेना तुटली होती. ती या घटनेच्या निमित्ताने भाजप-शिवसेनेचे मनोमिलन (BJP-Shiv Sena alliance) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती झाल्यास आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्व कायम राहून जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युती असताना जळगाव जिल्हा परिषदेवर गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सलग भाजप-शिवसेना युती कायम होती. त्यावेळी ज्या पक्षाकडे जास्त जागा त्यांच्याकडे अध्यक्ष पद तर कमी जागा असलेल्या पक्षाकडे उपाध्यक्ष पद असे सूत्र ठरले होते. या सूत्रानुसार भाजपकडे जि.प.अध्यक्ष, समाजकल्याण, आरोग्य सभापती तर शिवसेनेकडे उपाध्यक्ष,महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन सभापती असे पदे वाटप करण्यात आलेली होती.

सन 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 33 जागा, शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 16, काँग्रेस 4 असे पक्षीय बलाबल होते. या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत अंतर्गत कलहातून दरी निर्माण झालेली असल्याने भाजपने शिवसेनेला चेकमेट देवून काँग्रेसच्या टेकूवर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली.

उज्ज्वला पाटील यांनी जि.प.अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अडीच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक होता. जि.प.अध्यक्ष पदासाठी रंजना प्रल्हाद पाटील यांच्या निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मीना पाटील व काँग्रेसचे दिलीप पाटील यांना गळाला लावून सत्तेचे सोपान सर केले होते. त्यानंतर सभापती पदासाठी भाजपचे जि.प.सदस्य मधुकर काटे, अमित देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे जि.प.सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील, गजेंद्र सोनवणे, उज्ज्वला माळके यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र,पक्षाच्या वरिेष्ठ नेत्यांनी मधुकर काटे, अमित देशमुख, गजेंद्र सोनवणे यांची समजून काढून त्यांना माघारी घेण्यास भाग पाडले होते.

त्यानंतर सत्तेची दीड वर्ष संपल्यानंतर पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेत भाजपला आव्हान दिले होते. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची जि.प.गटनेत्यांनी भेट घेऊन राजकीय स्थित्यांत्तर होण्याची वर्तविली होती. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी भेट घेऊन राजकीय खळबळ उडाली होती. मात्र, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपन्यास 1 वर्षच बाकी असल्याने गटनेत्यांनी खर्च करुनही काय साध्य होणार? या भूमिका घेतल्यानंतर सत्ता परिवर्तनाचे महाविकास आघाडीचे मनसुबे धुळीस मिळाले होते.

आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी भाजप-शिवसेना युतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत बंडखोरी केल्याने त्याचे पडसाद राज्यभरासह जळगाव जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. आमदारांच्या बंडानंतर राज्यात भाजप-शिवसेना युती झाल्यास जिल्हा परिषदेमध्येही युतीची तुतारी निनादण्याची आस लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या