Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; सिल्लोड न्यायालयाने दिले 'हे' आदेश

मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; सिल्लोड न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल (Filed Case) करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे….

- Advertisement -

Rain Update : पुढील तीन ते चार तासात राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकचं काय?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) निवडणूक आयोगाला (Election Commission) संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस (Police) तपासात उघड झाले आहे.

Coal Scam : कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी खासदारासह सहा जण दोषी

मंत्री सत्तार यांनी एक जमीन २०१४ ला खरेदी केली होती.मात्र, त्या जमिनीची किंमत २०१९ मध्ये जास्त दाखवण्यात आली आहे. अशाच एकूण ४ ते ५ मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचे न्यायालयाच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने (Sillod Court) याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार

दरम्यान, याप्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ मध्ये याचिका (Petition) दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तारुखेडलेतील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला सोन्याचा भाव; पाच एकरमधील शेतमालाला १४ लाखांची बोली

- Advertisment -

ताज्या बातम्या